E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पालखी सोहळ्यासाठी वारकर्यांना सर्व सुविधा द्या
Wrutuja pandharpure
20 May 2025
महापालिका आयुक्तांच्या प्रशासनाला सूचना
पुणे
: पालखी सोहळ्याच्या पर्श्वभुमीवर पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकर्यांसाठी विसावा, आराम कक्ष उभारावेत. या कक्षांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, पंखे, स्वच्छतागृह, इमर्जन्सी मेडिकल युनिट यांची सुविधा असावी. वारकर्याच्या आरोग्यसेवेसाठी फिरते दवाखाने आणि मोबाईल स्वच्छतागृह व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी, आदी सूचना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रशासनाला दिल्या.
पुढच्या महिन्यात शहरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगत्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन होऊन त्यांचा शहरात मुक्काम असणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पालखी मार्गावरील सोई सुविधा, स्वच्छता, रस्ता, सुरक्षेच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पाहणी केली. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, प्रकल्प विभागाचे प्रमुख युवराज देशमुख, उपायुक्त अविनाश सकपाळ आदी उपस्थित होत. येरवडा-कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय या ठिकाणी सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारण्यात येणार आहे.
पालखी सोहळ आणि मुक्कामांच्या दिवशी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांसोबत समन्वय ठेवा, दिंडी सोहळ्याला वाहतुकीचा अडथळा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. पथ विभागामार्फत पदपथ व रस्त्यांची डागडुजी, तसेच रस्त्यालगतच्या सिमाभिंतींचे रंगकाम करावे. पालखी मार्गातील अडथळा ठरणार्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी. विसाव्याच्या ठिकाणी प्रसाद वाटप करताना गर्दी होऊन आपत्ती होऊ नये यासाठी अग्निशमन सुविधांची उपलब्धता असावी. पाणीपुरवठा विभागाने पालखी मार्गावर व सर्व पेठांमध्ये २४ तास पाणीपुरवठा करावा. देखभाल आणि दुरुस्तीसाठी २४ तास कार्यरत यंत्रणा तैनात करावी. पालखी मुक्काम स्थळांवरील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती पूर्ण करावी. महापालिका शाळांमध्ये मुक्कामी असणार्या दिंड्यांसाठी पाणीपुरवठा व पुरेशी शौचालये उपलब्ध करून द्यावीत. वारकर्यांच्या आरोग्यासाठी २४ तास स्वच्छता राखण्यात यावी, असे आदेश महापालिका आयुक्तांनी प्रशासनाला दिले.
Related
Articles
पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईत १४ बंडखोर ठार
05 Jun 2025
दहशतवाद नष्ट करणार : राजनाथ
31 May 2025
आमदाराच्या घरात शिरणार्यास अटक
31 May 2025
सेवा रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत
30 May 2025
जप्त केलेल्या ४९ वाहनांचा १२ जूनला लिलाव
04 Jun 2025
पाकिस्तानी टिकटॉकरची गोळ्या झाडून हत्या
03 Jun 2025
पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईत १४ बंडखोर ठार
05 Jun 2025
दहशतवाद नष्ट करणार : राजनाथ
31 May 2025
आमदाराच्या घरात शिरणार्यास अटक
31 May 2025
सेवा रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत
30 May 2025
जप्त केलेल्या ४९ वाहनांचा १२ जूनला लिलाव
04 Jun 2025
पाकिस्तानी टिकटॉकरची गोळ्या झाडून हत्या
03 Jun 2025
पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईत १४ बंडखोर ठार
05 Jun 2025
दहशतवाद नष्ट करणार : राजनाथ
31 May 2025
आमदाराच्या घरात शिरणार्यास अटक
31 May 2025
सेवा रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत
30 May 2025
जप्त केलेल्या ४९ वाहनांचा १२ जूनला लिलाव
04 Jun 2025
पाकिस्तानी टिकटॉकरची गोळ्या झाडून हत्या
03 Jun 2025
पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईत १४ बंडखोर ठार
05 Jun 2025
दहशतवाद नष्ट करणार : राजनाथ
31 May 2025
आमदाराच्या घरात शिरणार्यास अटक
31 May 2025
सेवा रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत
30 May 2025
जप्त केलेल्या ४९ वाहनांचा १२ जूनला लिलाव
04 Jun 2025
पाकिस्तानी टिकटॉकरची गोळ्या झाडून हत्या
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी